Thursday, 19 September 2013

माझा स्वार्थ......

" माझी तुझ्या कडून ही अपेक्षा नव्हती " ……… मग तुझ्या माझ्या कडून अपेक्षा तरी काय आहेत ????
तुला तुझ्या अवतीभोवती खुषामत करणारे लोक आवडतात …जे स्व स्वार्थापायी तुझा वापर करून घेतात …. हे तुला कधीच दिसत नाही का ??? कि कळून ही मोठेपणा मिळवण्यासाठी तू हे सगळे करतो आहेस.

तुझ्या विरोधात मी काही बोलली की तुला त्यात माझी ईर्षा दिसते … मी तुझ्या प्रगतीवर जळते …. तुझा हेवा करते असे तुझे मत होते …

हेच का आपले प्रेम …. कि तुला आता त्यात सुद्धा माझा स्वार्थ दिसतो …

बराच वेळ रोखून धरलेले डोळ्यातले पाणी अन हुंदका आता फुटला होता …. फोन तसाच चालू होता …. पलीकडे तो ऐकत होता … पण तिला जवळ घेऊन तिला समजावू शकत नव्हता ….

ती मात्र त्याच्या आरोपाने दुखावली गेली होती … तिच्या निस्वार्थ प्रेमाला त्याने इर्षेचे नाव दिले होते… ती आत तुटली होती ….

तिचे स्टेशन जवळ येत होते …. यंत्रवत उठून ती निघून गेली स्टेशन वर उतरून …. अन मागे राहिले बरेच अन्नुतरित प्रश्न …

( आज ट्रेन मधून येताना हा सगळा संवाद कानी पडला …. आणि मनात विचाराचे वादळ सुरु झाले )
 

Wednesday, 6 June 2012

पाऊस असाच बरसत राहणार ....मनाला रडवून गात्रं भिजवून जाणार 
तुझ्या स्पर्शाच्या विरहात मी मात्र तरसत राहणार .....

प्राजक्त 

Thursday, 30 June 2011

संवाद थांबले .... अन वाद ही संपले ....
तुझ्या अबोल्याने ....काळजाची लय कायमची चुकली .... 

Wednesday, 25 May 2011

ओढ

मूक भाषा ही प्रीतीची, शब्द रुपात उलगडू कशी रे....
ओढ अंतरीची तुला कशी उमगेना सख्या......
विरहाची काळी रात आणखी किती दिस.....
तुझ्या विरहात किती रडू रे प्रिया ....प्राजक्त 

Wednesday, 4 May 2011

अट्टहास


सप्तपदी चालून मन जुळतात का रे ??
मंगलसूत्राच्या काळ्या मण्यांनी प्रेम मिळते का रे ??
मग तुझ्या अन माझ्या प्रेमाला नात्याचा अट्टहास  का ?? 

Friday, 15 April 2011

मिलन

प्रतीक्षेच्या कित्येक युगानंतर तुझे न माझे पुन्हा मिलन झाले ....
विरहाचा  प्रत्येक क्षण.....आसवान सवे तुझ्या कुशीत शांत निजला...
अन ओठांची अनाम ओढ तुझ्या स्पर्शाने स्मरते.... 
हळवे अलवार कातर आपुले क्षण ..... 
प्राजक्त  :-) 


Sunday, 27 March 2011

निर्णय

चुकलेल्या निर्णयाची फळे जन्मभर भोगणार आहे ....
मेलेले नातं तुळशी वृंदावनात आयुश्याभर पूजणार आहे ....