Thursday, 19 September 2013

माझा स्वार्थ......

" माझी तुझ्या कडून ही अपेक्षा नव्हती " ……… मग तुझ्या माझ्या कडून अपेक्षा तरी काय आहेत ????
तुला तुझ्या अवतीभोवती खुषामत करणारे लोक आवडतात …जे स्व स्वार्थापायी तुझा वापर करून घेतात …. हे तुला कधीच दिसत नाही का ??? कि कळून ही मोठेपणा मिळवण्यासाठी तू हे सगळे करतो आहेस.

तुझ्या विरोधात मी काही बोलली की तुला त्यात माझी ईर्षा दिसते … मी तुझ्या प्रगतीवर जळते …. तुझा हेवा करते असे तुझे मत होते …

हेच का आपले प्रेम …. कि तुला आता त्यात सुद्धा माझा स्वार्थ दिसतो …

बराच वेळ रोखून धरलेले डोळ्यातले पाणी अन हुंदका आता फुटला होता …. फोन तसाच चालू होता …. पलीकडे तो ऐकत होता … पण तिला जवळ घेऊन तिला समजावू शकत नव्हता ….

ती मात्र त्याच्या आरोपाने दुखावली गेली होती … तिच्या निस्वार्थ प्रेमाला त्याने इर्षेचे नाव दिले होते… ती आत तुटली होती ….

तिचे स्टेशन जवळ येत होते …. यंत्रवत उठून ती निघून गेली स्टेशन वर उतरून …. अन मागे राहिले बरेच अन्नुतरित प्रश्न …

( आज ट्रेन मधून येताना हा सगळा संवाद कानी पडला …. आणि मनात विचाराचे वादळ सुरु झाले )
 

No comments:

Post a Comment