Thursday 30 June 2011

संवाद थांबले .... अन वाद ही संपले ....
तुझ्या अबोल्याने ....काळजाची लय कायमची चुकली .... 

Wednesday 25 May 2011

ओढ

मूक भाषा ही प्रीतीची, शब्द रुपात उलगडू कशी रे....
ओढ अंतरीची तुला कशी उमगेना सख्या......
विरहाची काळी रात आणखी किती दिस.....
तुझ्या विरहात किती रडू रे प्रिया ....



प्राजक्त 

Wednesday 4 May 2011

अट्टहास


सप्तपदी चालून मन जुळतात का रे ??
मंगलसूत्राच्या काळ्या मण्यांनी प्रेम मिळते का रे ??
मग तुझ्या अन माझ्या प्रेमाला नात्याचा अट्टहास  का ?? 

Friday 15 April 2011

मिलन

प्रतीक्षेच्या कित्येक युगानंतर तुझे न माझे पुन्हा मिलन झाले ....
विरहाचा  प्रत्येक क्षण.....आसवान सवे तुझ्या कुशीत शांत निजला...
अन ओठांची अनाम ओढ तुझ्या स्पर्शाने स्मरते.... 
हळवे अलवार कातर आपुले क्षण ..... 
प्राजक्त  :-) 


Sunday 27 March 2011

निर्णय

चुकलेल्या निर्णयाची फळे जन्मभर भोगणार आहे ....
मेलेले नातं तुळशी वृंदावनात आयुश्याभर पूजणार आहे .... 

Thursday 24 March 2011

स्वप्न

माझ्या डोळ्यातले स्वप्न
अश्रुंसवे वाहुन गेले
तुझी  वाट पाहता पाहता
अश्रुंमधेच विरुन गेले ....

प्राजक्त

Wednesday 23 March 2011

प्रतीक्षा

नियतीने मांडलेला हा दुर्देवाचा फेरा आता तरी संपव देवा .......
सुखाचे आंदण आता तरी पदरी घाल रे देवा...
साडेसात वर्षाची प्रतीक्षा आता तरी सरू दे रे दयाघना.....

Monday 21 March 2011

आज पुन्हा एकदा हरले मी...सर्वस्व तुला वाहून हि तुला मिळवणे आता अशक्यप्राय झाले .....
कुठे चुकले मी ... प्रेमात... कुठे कमी पडले...एकवार तरी संग आता माझा गुन्हा.....

प्राजक्त

Thursday 10 March 2011

अश्वथामा

भळभळनारी जखम घेवून अश्वथामा आज ही जिवंत आहे...
जगण्याचा शाप घेवून हजारो जीव आज ही त्याचाच मार्ग शोधत आहेत ...





Monday 7 March 2011

वाट


तुझ्या आठवणीत जागवलेल्या रात्री, आसवांनी भिजलेले माझे डोळे... आज ही तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसले आहेत ...आता तरी मागे फिर रे सजना...हळवी आर्जवे करता करता दारातली रातराणी ही कोमजली रे ....

प्राजक्त


Wednesday 2 March 2011

परीस

तू सोबत असलास कि मन प्रसन्न हसते, सारे दुख क्षणात विरून जाते....
तुला आठवून भलतेच कोडे घालते, उत्तर शोधता शोधता मनातले गूढ आणखी गहिरे होत जाते,
तुझ्या माझ्या नात्याला कधी परीस स्पर्श देवून जाते ....

प्राजक्त



Tuesday 1 March 2011

जखम

आज तो दिसला मला , कितेक्य वर्षाने .....तसाच लाघव हसताना ...
न खपली धरलेली जुनी जखम  पुन्हा भळाभळा वाहू लागली......
माझ्या अश्रूच्या सवे.....

प्राजक्त

घुसमट

इवल्यासं मन माझे...अनेक प्रश्न त्याला सतावतात.... 
शब्द जोडून उत्तरही शोधते...पण कोणास ठाऊक का....
एक रुखरुख कायम सलते...
कुठे चुकलं माझे....एक अक्षर ही न बोलता तू एवढा परका झालास....
ओठ अबोल होतात...न डोळे ओठांची घुसमट बघून ओलावतात....
 
प्राजक्त
मूक भाषा ही प्रीतीची, शब्द रुपात उलगडू कशी
ओढ अंतरीची माझ्या,सख्या तुला उमगेना कशी विरहाची काळी रात आणखी किती दिवस रडवेल
अबोल तुझ्या आठवणीना आसवातून गाळू मी कशी..

प्राजक्त

विरह


मिटलेल्या पापण्याच्या कडा ओलाऊ लागल्या....
नयनी माझ्या तुझ्या आठवणीचे क्षण दाटू लागले...
तुझ्या माझ्या विरहाने...अंगणीचा प्राजक्त ही कोमेजू लागला......

प्राजक्त



तू सुगंध बनून अजून दरवळतोस श्वासात माझिया ...
अंगणीचा पारिजात बरसतो नसानसात माझ्या...
का कळेना पण असे काय झाले ...
श्वास अडकलेत माझे श्वासात तुझिया ....

प्राजक्त

Friday 25 February 2011

बंध

तुझ्या माझ्या नात्याचे बंध
मी अजूनही तसेच जपते
तुझ्या गोड आठवणीनी
डोळ्यातली आसवे टिपते

प्राजक्त