Thursday, 30 June 2011

संवाद थांबले .... अन वाद ही संपले ....
तुझ्या अबोल्याने ....काळजाची लय कायमची चुकली .... 

Wednesday, 25 May 2011

ओढ

मूक भाषा ही प्रीतीची, शब्द रुपात उलगडू कशी रे....
ओढ अंतरीची तुला कशी उमगेना सख्या......
विरहाची काळी रात आणखी किती दिस.....
तुझ्या विरहात किती रडू रे प्रिया ....



प्राजक्त 

Wednesday, 4 May 2011

अट्टहास


सप्तपदी चालून मन जुळतात का रे ??
मंगलसूत्राच्या काळ्या मण्यांनी प्रेम मिळते का रे ??
मग तुझ्या अन माझ्या प्रेमाला नात्याचा अट्टहास  का ?? 

Friday, 15 April 2011

मिलन

प्रतीक्षेच्या कित्येक युगानंतर तुझे न माझे पुन्हा मिलन झाले ....
विरहाचा  प्रत्येक क्षण.....आसवान सवे तुझ्या कुशीत शांत निजला...
अन ओठांची अनाम ओढ तुझ्या स्पर्शाने स्मरते.... 
हळवे अलवार कातर आपुले क्षण ..... 
प्राजक्त  :-) 


Sunday, 27 March 2011

निर्णय

चुकलेल्या निर्णयाची फळे जन्मभर भोगणार आहे ....
मेलेले नातं तुळशी वृंदावनात आयुश्याभर पूजणार आहे .... 

Thursday, 24 March 2011

स्वप्न

माझ्या डोळ्यातले स्वप्न
अश्रुंसवे वाहुन गेले
तुझी  वाट पाहता पाहता
अश्रुंमधेच विरुन गेले ....

प्राजक्त

Wednesday, 23 March 2011

प्रतीक्षा

नियतीने मांडलेला हा दुर्देवाचा फेरा आता तरी संपव देवा .......
सुखाचे आंदण आता तरी पदरी घाल रे देवा...
साडेसात वर्षाची प्रतीक्षा आता तरी सरू दे रे दयाघना.....